…म्हणून मिसेस फडणवीसांनी आमदार रोहित पवारांचे आभार मानले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- आपल्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी पोहचल्या आहेत.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं लाँच करण्यात आलं होतं. ‘कुणी म्हणाले वेडी मुलगी’ असं शिर्षक असलेलं गाणं अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

ते ऐकल्यानंतर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं.

या ट्विटला अमृता फडणवीस यांनी आज रिप्लाय दिला आहे. धन्यवाद रोहीत भाऊ, असा रिप्लाय देत अमृता फडणवीस यांनी रोहित पवारांचे आभार मानले आहेत.

नेमके काय म्हणाले रोहित पवार ट्विट मध्ये ? :-

जाणून घ्या “काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करुनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही.

पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24