राममंदिरासाठी ४४ दिवसांत जमा झाली ‘एवढी’ देणगी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या मंदिर बांधकामासाठी देणगी गोळा करण्याची मोहीम वेगात सुरू आहे आतापर्यंत सर्वसामान्यांसह राजकीय, सामाजिक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मोहिमेला प्रतिसाद देत देणगी दिली आहे.

राम निर्माणासाठी दान जमा करण्याचे हे अभियान शनिवारी पूर्ण झालं आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या या अभियानात आतापर्यंत जवळपास २१०० कोटी रुपये जमा झाले आहेत.

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारपर्यंत २१०० कोटी रुपये जमा झाले आहेत.गेल्या ४४ दिवसांत ही देणगी जमा झाली आहे.

गिरी यांनी परदेशात राहणारे रामभक्तही इतर देशांमध्येही अशीच मोहीम सुरू करावी अशी मागणी करत आहेत. अशा लोकांकडून देणगी कशी गोळा करावी याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल.

श्री राम यांचा जन्म अयोध्येत झाला होता, मंदिर बांधले गेले होते, हा मुद्दा देशाच्या स्वातंत्र्या प्राप्तीच्या काळापासून प्रलंबित होता. त्याचे बांधकाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेले असं म्हटलं आहे.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी परिसरात सुरू असलेलं खोदकाम जवळपास १६ फूटांपर्यंत झालं आहे.

ज्या लेवलवर ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली होती, त्या लेवलपासून ५ मीटर खाली जमिनीचे खोदकाम झाले आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24