अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज दीड हजार ते दोन हजारच्या दरम्यान चाचण्या केल्या जात आहेत. याशिवाय शहरातील दोन खासगी लॅबमध्येही मोठ्या प्रमाणावर चाचण्या होत आहेत.
१ फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
१० फेब्रुवारीपासून त्यात आणखी वाढ करण्यात आली असून आजमितीस जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमध्ये १ हजार ५०० ते २ हजारपर्यंत चाचण्या केल्या जात आहेत.
जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागलेली असून त्यात सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून येत आहेत.
शहरातील ॲक्टीव्ह रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून सध्या ४५४ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. गुरुवारी (दि.२५) एकाच दिवसात तब्बल ७४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसांतील ही मोठी संख्या आहे. बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या असून शहरात अनेक ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब बाधीत आढळून आलेले आहेत.
त्यांच्या संपर्कातील सर्वांच्या चाचण्या करण्यासाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. दरम्यान,
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने शहरात महापालिकेने सुरू केलेली पाचही कोव्हिड सेंटर बंद करण्यात आली होती.
मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागल्याने टप्प्याटप्प्याने ही कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहरातील नटराज हॉटेल व जैन पितळे होस्टेल या दोन ठिकाणी लवकरच कोव्हिड सेंटर कार्यान्वित होणार आहेत.