…म्हणून शेतकऱ्याने उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :-  कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटकली आहे. लॉकडॉनमुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्याने लाल भोपळा हे पीक घेतले.

पीक चांगले आले मात्र ऐनवेळी माशी शिंकली अन् या  पिकाला योग्य भाव व कोणी खरेदीदार मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क उभ्या पिकावरच ट्रॅक्टर फिरवला आहे. देशात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शासनाने आठवडी बाजारावर बंदी आणली.

त्यामुळे शेतमाल बेभाव झाला. पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील अल्पभूधारक शेतकरी वासुदेव  कराळे, यांची तीन एकर बागायती शेती आहे. त्यांनी त्यातील दोन एकरात लाल भोपळा या पिकाची पेरणी केली.

वेळेवर पिकाला पाणी, निंदण, खत, महागडे कीटक नाशकाची फवारणी केली. त्यातही या पिकाला दर्जेदार फळ धारणा झालीच नाही, तसेच त्यातील काही लहान फळ कोमजून वाळू लागली. दोन एकरातील गंगाफळ पिकाला एकूण तीस हजार रुपये खर्च आला.

या बिकट परिस्थितीमुळे पिकाला लागलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.

एकीकडे दर नसल्याने ही अवस्था आहे तर  दुसरीकडे  महागडी खते, बियाणे घेवून पेरणी केली मात्र अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे खरिपाची पिकेही धोक्यात आली आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24