म्हणून ‘त्या’ उपसरपंचाला पोलिसांनी केली अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- पारनेर तालुक्यातील निघोजचे नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या तलाठ्याला मारहाण केली. या बाबतचा तलाठी विनायक निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

त्यावरून पोलिसांनी नवनिर्वाचित उपसरपंच वरखडे यांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, निघोजचे उपसरपंच वरखडे यांचा एक कार्यकर्ता तलाठी निंबाळकर यांच्याकडे काम घेवून गेला व म्हणाला, मला सरपंचाने पाठवले आहे माझे काम करा, त्यावर त्याला तलाठी म्हणाले,  तुम्हाला थांबावे लागेल.

माझ्या समोर एक काम चालू आहे. ही घटना त्या कार्यकर्त्याने उपसरपंचांना फोन करून सांगितली. त्यानंतर उपसरपंच वरखडे यांनी तलाठी कार्यालयात प्रवेश करून निंबाळकर यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत तलाठी निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने आरोपी ज्ञानेश्वर वरखडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.या घटनेमुळे निघोजमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24