अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांसाठी दूध उत्पादकांनी मंगळापूर दूध संकलन केंद्रासमोर रस्त्याच्या कडेला सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन केले.
दूधाचे भाव पडले तरी सरकार हस्तक्षेप करत नाही, दूध उत्पादक शेतकर्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, शेतकर्यांच्या मागण्यांकडे जर दुर्लक्ष केले गेले तर आगामी काळात दूध उत्पादक शेतकरी तीव्र आंदोलन करतील, शेतकर्यांच्या पोरांची डोके अजून शांत आहे, तेव्हा सरकारने विचार करावा,
अन्यथा शेतकर्यांच्या पोरांची डोकी फिरली तर मंत्र्याची डोकी फोडल्याशिवाय या शेतकर्यांची पोरं स्वस्त बसणार नाही, असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे दिपक वाळे यांनी दिला आहे. दरम्यान नगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र व राज्य सरकारचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे.
करोना काळातील परिस्थितीचा गैरफायदा घेत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकर्यांना कमी दर देवून शेतकर्यांची लूट केली आहे.
या संघाची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी आज दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, किसान सभा व समविचारी शेतकरी संघटनांच्यावतीने आज संगमनेर तालुक्यातील मंगळापूर येथे सरकारच्या प्रतिकात्मक दगडाला दूधाचा अभिषेक घालून आंदोलन केले.
लॉकडाऊनच्या काळाच मागणी घटल्याचा बाऊ करत खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले. त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत चौकशी करा,
परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकर्यांची लूटमार करणार्या खासगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.