अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. यातच या संकटाचा मुकाबला करण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत.
त्यारून त्यांनी एक अभियानाचे आयोजन केले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्ण वाढत असले तरी हर्ड इम्युनिटीही तयार होत आहे.
अनेकांमध्ये करोनाच्या अँटीबॉडीजही तयार झालेल्या असू शकतात. यादृष्टीने नगर शहरात 8 विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत नागरिकांसाठी अँटीबॉडी तपासणी अभियान आयोजित केले आहे.
सोमवार (दि.17) पासून इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात ही अँटीबॉडी तपासणी सुविधा सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत उपलब्ध असेल.
या तपासणीसाठी प्रति व्यक्ती 300 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. थायरोकेअरची टीम ही तपासणी करणार आहे.
या टेस्टमध्ये शरिरात अँटीबॉडी आढळून आल्या तर तुम्हाला करोना होऊन गेला आहे हे लक्षात येईल. तसेच पुढचे किमान 3 महिने नव्याने करोनाची बाधा होणार नाही
याची शाश्वती मिळते. ज्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडी टेस्टचा रिझल्ट 15 च्या पुढे असेल त्या व्यक्ती प्लाझ्मा दानही करू शकतील.