अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- आज विविध स्तरातून समाजावर अन्याय होत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम लहुजी शक्ती सेनेच्यावतीने करण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावरील पदाधिकार्यांनी आक्रमक राहिले पाहिजे.
सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा मोठा परिणाम समाजावर होत आहे. अशा धोरणांना विरोध करुन समाजाच्या हक्कासाठी आपण लढले पाहिजे. आज महागाई, आरक्षण अशा विविध प्रश्नांमध्ये समाज भरडला जात आहे.
यासाठी वेळेच आवाज उठविला पाहिजे. जिल्हास्तरीय शाखांनी संघटना मजबूत करुन संघटनेचे काम वाढवावे, असे प्रतिपादन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी केले. लहुजी शक्ती सेनेच्या अहमदनगर जिल्हास्तरीय बैठकीत श्री. कसबे बोलत होते.
बैठकीस विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड. हेमंत खंदारे, जिल्हा प्रमुख सुनिल शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, जिल्हा युवक प्रमुख उत्तम रोकडे, जिल्हा सरचिटणीस संतोष शिंदे, वसंत अवचिते, युवराज आवचार, विनोद साळवे, शशिकांत कनिंगध्वज, उषाताई शिंदे, देवेंद्र आल्हाट, बाळा खरात, रघुनाथ वैरागर, आशाताई राजहंस, सोनालीताई वायदंडे, विशाल साळवे,
गणेश ढोबळे आदींसह संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कै. सोमनाथ कांबळे यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष अॅड. हेमंत खंदारे म्हणाले, कार्यकर्ता पदाधिकार्यांमध्ये विष्णुभाऊ यांच्या आगमनाने ऊर्जा निर्माण झाली आहे.
येत्या काळात लावकरच अहमदनगर मध्ये लहुजी शक्ती सेना ही हटक्या स्टाईल ने रस्त्यावर उतरणार आहे. येत्या महिन्याभरात 101 शाखेचे आयोजन लहुजी शक्ती सेना अहमदनगर जिल्हा कार्यकरणी यांच्याकडून व्हावे असे आशा बाळगली.
याप्रसंगी जिल्हा प्रमुख सुनिल शिंदे यांनी प्रास्तविकात आज पर्यंत जे काम चालू आहे त्यापेक्षा पुढे अजून जोमाने काम करु. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारण्यासाठी लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले संघटना वाढीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
पुढील काळात अहमदनगर जिल्ह्यात लवकरच मोठे सामाजिक प्रश्नांवर आंदोलन, मोर्चा, धरणे लहुजी शक्ती सेनेच्यावतीने करुन समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. बैठकीस जिल्हातील बहुसंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते व पुढील काळात जोमाने कामाला लागू असे आश्वासन सर्व पदाधिकार्यांनी दिले.