अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- जामखेड तालुक्यातील विविध कार्य. विकास संस्थेचे सचिव लेकुरवाळे सुरेश बलभीम हे तालुक्यातील जवळा संस्थेच्या कार्यालयात काम करत होते.

यावेळी संस्थेचे सभासद नसलेल्या काही लोकांनी कार्यालयात येवून लेकुरवाळे यांना कर्जाची मागणी करत दमदाटी व मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील जवळा येथील सेवा सोसायटीत काम करत असताना या लोकांनी सभासद नसताना कर्ज मागणी केली व विनाकारण दमदाटी करत जबर मारहाण केली.

अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आळा न घातल्यास तालुक्यातील इतर सचिवांना देखील त्रास होण्याची शक्यता असल्याने बाकीच्या सचिवांना त्रास होऊ नये

याकरिता त्यांच्यावर क करावी या मागणीचे निवेदन जामखेड सचिव संघटनेच्या वतीने देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक न केल्यास

जामखेड तालुक्यातील सभासदांचे कर्ज वाटप व इतर कामकाज दि.१० पासून संपूर्ण तालुका बंद करण्यात येईल व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असे निवेदन संघटनेने दिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24