अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- मागील दीड वर्षात आलेल्या कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अहोरात्र काम करीत असून यामध्ये आरोग्य विभाग अग्रभागी असून कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी दिलेलं योगदान समाज कधीच विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
“डॉक्टर्स डे” निमित्त कोपरगाव येथे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे केलेल्या उपाय योजनेतून दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविता आले.
दुसरी लाट ओसरत असतांना आरोग्य विभागाकडून तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आले आहे.त्यामुळे दुसऱ्या लाटेत आलेल्या ऑक्सिजनच्या अडचणींचा विचार करून त्या दृष्टीने काही प्रमाणात ऑक्सिजनचा व औषधांचा साठा केल्यास अडचणी कमी होतील.
ग्रामीण रुग्णालयात जिल्हा नियोजनाच्या निधीतून ऑक्सिजन प्लॅटची उभारणी केली आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात येणार असून त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
तसेच कर्मवीर शंकरराव काळ सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने २५ मीटर क्यूब ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारलेला आहे. त्या माध्यमातून जवळपास ९० जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
आवश्यक असणारी पूर्व तयारी जरी केली असली तरी सतर्क राहणे गरजेचे आहे. आजपर्यत सर्व डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्यसेवा देतांना जे सहकार्य केले ते सहकार्य यापुढे देखील ठेवावे असे आवाहन करून सर्व डॉक्टरांचे आभार व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक पद्माकांतजी कुदळे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथजी जामदार, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, डॉ. अजय गर्जे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. दत्तात्रय मुळे,डॉ. तुषार गलांडे, डॉ. आतिष काळे, डॉ. दिपक पगारे, डॉ. राजेंद्र रोकडे, डॉ. योगेश कोठारी, डॉ. गणेश ठोंबरे, डॉ. अमोल अजमेरे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. राजेश माळी
डॉ. योगेश लांडे, डॉ. मयुर तिरमखे, डॉ. रमेश सोनवणे, डॉ. नरेंद्र गायकवाड, डॉ. राकेश भल्ला, डॉ. हर्षद आढाव, डॉ. शांताराम आढाव, डॉ. शिवाजीराव रोकडे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. भाग्यश्री घायतडकर,
डॉ. वर्षा रोकडे, डॉ. दिपाली आचारी, डॉ. प्रसाद काळवाघे, डॉ. स्वप्नील सोनवणे, डॉ. सालिया पठाण, डॉ. झिया शेख डॉ. अमण रासकर, डॉ. तेजस सोमासे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.