अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- गेल्या तीन दिवसांत आणखी तीन बड्या नेत्यांची प्रकरणे हाती आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळाही लवकरच बाहेर काढणार आहे.
कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही,” अशा शब्दांत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. राज्यातील सरकार हे गुंड आणि माफियांचं आहे म्हणत, त्यांचे ठेकेकार हे सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात.
मात्र आता अशा गैरव्यवहाराच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचा दावा सोमय्यांनी केला. यादरम्यान सोमय्या हे आज नगर जिल्ह्यातील पारनेर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी आज नगर जिल्ह्यातील पारनेर येथील साखर कारखान्याला भेट दिली.
या कारखान्याच्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार कारखाना बचाव समितीने त्यांच्याकडे केली होती. त्यानुसार सोमय्या पारनेरला आले होते. त्यांनी कारखान्याचे कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा साखर कारखाना कुणामुळे आजारी पडला हे लवकरच समोर येईल असं सांगितलं.
या कारखान्याबाबत ईडीने जोरदार तपास सुरु केला आहे, त्यामुळे लवकर यातून सत्य बाहेर येईल असं सोमय्या म्हणाले. सोमय्यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. “मी जे काम करतो, त्याला आरोप म्हणून नका. मी तपास यंत्रणांना माहिती आणि पुरावे देऊन पाठपुरावा करीत असतो.
पारनेर कारखान्याच्या विक्रीतही संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे त्यानुसार त्याची चौकशी सुरू आहे. आता त्याला गती आली आहे,” असेही सोमय्या म्हणाले.