ताज्या बातम्या

“काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत”; नवाब मलिकांच्या कारवाईवरून नरेंद्र मोदींचा शरद पवारांना टोला

Published by
Ahmednagarlive24 Office

नवी दिल्ली : काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल (Election Result) जाहीर झाला आहे. यामध्ये ५ पैकी ४ जागेवर भाजपने (BJP) मुसंडी मारत कब्जा केला आहे. याचेच सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपने दिल्लीत (Delhi) कार्यक्रम ठेवला होता. यावेळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील कारवाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे.

मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊशी जोडला जातोय असा आरोप शरद पवार यांनी केला होता. आता त्याच आरोपांना नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, लोकांच्या मनात अशा भ्रष्टाचाऱ्यांबाबत एक प्रकारचा राग आहे. भाजप 2014 मध्ये एक इमानदार सरकारचं आश्वासन देत निवडणूक लढवली. 2019 ला पुन्हा आम्हाला जनतेनं सत्तेत बसवलं.

देशाला आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही भ्रष्टाचार संपवावा. पण आज आम्ही पाहतो की ज्या निष्पक्ष संस्था आहेत, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करतात, तर हे लोक त्या संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. अशी टीका पवारांवर केली आहे.

हे देशाचं मोठं दुर्भाग्य आहे की घोटाळ्यात बरबटलेले लोक आता या संस्थांवर दबाव बनवत आहेत. हे लोक या संस्थांना रोखण्यासाठी नवे नवे पर्यात शोधत आहेत. त्यांना न्यायपालिकेवरही विश्वास नाही. असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

लोक कोणत्याही भ्रष्टाराऱ्यांवर कारवाई होताना त्याला धर्म, जातीचा रंग देतात. एखाद्या माफियाविरोधात न्यायालय निर्णय देतं तेव्हा त्यालाही जात, धर्माशी जोडलं जातं.

मी सर्व संप्रदायातील लोकांना अपील करतो की अशा लोकांना आपल्या समाजापासून दूर करण्याची हिम्मत करा. यामुळे समाजाचं भलं होईल. वाराणसीचा खासदार असण्याच्या नात्यानं यूपीतील लोकांच्या प्रेमानं मलाही उत्तर प्रदेशचा बनवून टाकलं.

मी माझ्या अनुभवातून सांगतो की यूपीतील लोक जात, संप्रदायाला बदनाम करणाऱ्यांपासून दूर होत राज्याच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे असेही नरेंद्र मोदी बोलताना म्हणाले आहेत.

Ahmednagarlive24 Office