अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- अनेकांचे स्वप्न असते कि नोकरी सोडून व्यवसाय करावा. जर तुम्ही देखील व्यवसाय करण्याची योजना आखत असाल किंवा तुम्ही घरी बसून पैसे कमावण्याच्या मार्ग शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही व्यवसायांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा बक्कळ कमाई करू शकता.

आर्थिक भांडवलाशिवायही तुम्ही उद्योग करू शकता. हो, कुठलंही आर्थिक भांडवल नसताना, पैसे न गुंतवता किंवा अगदी हजार पाचशेतही तुम्ही उद्योग सुरू करू शकता.

उद्योगाच्या अश्या खूप सार्‍या कल्पना आहेत ज्या वास्तवात आणायला तुम्हाला पैसे नाही लागणार. शून्य भांडवलात सुरू करू शकतो असे उद्योग कोणते ते समजून घेऊ.

रिसेलर- कुठल्याही वस्तूची तुम्ही रिसेलिंग करू शकता. ऑनलाइन रिसेलिंग सध्या जोरात चालू आहे. यात तुम्हाला एक रूपयाही खर्च नाही आणि भांडवलाचीही गरज नाही. तुम्ही एखाद्या उत्पादकाशी संपर्क करून त्याच्या उत्पादनाची संपूर्ण माहीती ( किमतीसह ) घ्यायची आणि तीच माहीती ( मूळ किमतीत तुमचा नफा मिळवून ) सोशल मीडियावर टाकू शकता.

सोशल मीडिया हे उद्योगासाठी खूप उपयोगी माध्यम आहे. ज्यांना तुम्ही पोष्ट केलेले उत्पादन आवडेल ती लोकं तुमच्याशी त्याविषयी चौकशी करुन ती वस्तु तुमच्याकडून विकत घेऊ शकतात.

अर्थातच ती वस्तु तुमच्याकडे नाहीये तर उत्पादककडे आहे! ग्राहकाकडुन वस्तूचे पैसे आगाऊ घेऊन ती ऑर्डर तुम्ही उत्पादकाकडे पाठवायची ( आपला नफा आपल्याकडे ठेऊन ). उत्पादक ती वस्तु ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर पाठवतो. अश्या प्रकारे या उद्योगात आपला एक रुपयाही खर्च नाही झाला. या उद्योगात तुम्हाला जागेची गरज नाही,फक्त तुमचा वेळ थोडा जास्त खर्च होतो, पण हा उद्योगही तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.

क्लासेस :- भारतामध्ये सध्या क्लासेस ला सर्वात जास्त डिमांड आहे. भारतातील शिक्षण पूर्वीपेक्षा जास्त स्पर्धात्मक झाले आहे. कॅट, जेईई मेन, टीओईएफएल, आयईएलटीएस, सीए इत्यादी लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. ट्यूशन सर्विस देऊनही तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. हे काम ग्रामीण भागात तसेच शहरात वाढत आहे.

सुरूवातीस, विषय किंवा क्षेत्र निवडा ज्यामध्ये आपण परिपूर्ण आहात. आपण आपल्या कौशल्याच्या विषयावर ऑनलाइन चॅनेल सुरू करण्याबद्दल विचार करू शकता. स्वस्त डेटा आणि स्वस्त स्मार्टफोनमुळे डिजिटल शिक्षण लक्षणीय वाढत आहे.

ब्लॉगिंग : लिहिणं हा तुमचा छंद असेल तर तुम्ही ऑनलाईन ब्लॉग सुरू करू शकता. यामध्ये तुमच्या आवडीचे विषय तुम्ही निवडू शकता. खाद्यपदार्थांपासून ते ट्रेक, स्पोर्ट, आर्थिक, सामाजिक राजकीय इत्यादी कोणत्याही विषयांवर ब्लॉगिंग सुरू करा. याद्वारे चांगले उत्पन्न सुरू होते.

योग ट्रेनर :- आज, योग उद्योग देखील बरीच प्रगती करीत आहे आणि बर्‍याच स्त्रिया आपल्या दैनंदिन जीवनासाठी तसेच शारीरिक आरोग्यासाठी वेळ घालवण्याची काळजी घेत आहेत. जगभरात साथीचे रोग पसरत असताना, बहुतेक लोकांसाठी एक ऑनलाइन योग वर्ग हा एक उत्तम पर्याय आहे.

घराबाहेर काम करण्याच्या संस्कृतीमुळे लोकांना पूर्वीपेक्षा फिटनेसमध्ये अधिक रस आहे. योगा स्टुडीओ आता डिजिटल पाठांकडे वळत आहेत, ऑनलाइनद्वारे योग्यांना गर्दीपासून दूर राहून शांतपणे शिकता येऊ शकेल.

भाषांतर – हाही उद्योग शून्य भांडवलाचा आहे. तुम्हाला एकापेक्षा जास्त भाषा येत असतील तर आणि मराठीचं इंग्रजीत किंवा इंग्रजीचं मराठीत किंवा अजून कुठल्याही एका भाषेचं दुसर्‍या भाषेत भाषांतर करता येत असेल तर तुम्ही यातूनही चांगली कमाई करू शकता. आजकाल पुस्तकांच भाषांतर करण्याची खूप गरज आहे. एका भाषेचं पुस्तक दुसर्‍या भाषेत करून देऊन तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.