अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :-आज दि. ०३ सप्टे २०२१ रोजी विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण देवदैठण येथे करण्यात आले यावेळी बोलताना आमदार बबनराव पाचपुते म्हणाले की कोरोना मुळे निधी आणण्यात अनेक अडचणी येत असताना देखील तालुक्यामध्ये भरघोस विकास निधी आणण्याचे काम आपण केले आहे.
तालुक्यात विकास कामे जोरात चालू असताना काही लोकांच्या पोटात दुखत आहे व असे महाभाग चालू विकास कामांमध्ये अडथळा आणण्यातच धन्यता मानत आहेत. स्वतः आमदार असताना ज्यांनी डांबरी वर मुरूम टाकून तालुक्याला विकासाचा नवा मार्ग दाखवला ते आता विकासकामांबद्दल बोलत आहेत..
असा खोचक टोला कोणाचेही नाव न घेता पाचपुते यांनी लगावला. विकास निधी पुढील प्रमाणे- देवदैठण येथे- सिमेंट बंधारा नं.१ ६७ लक्ष ३२ हजार रुपये, सिमेंट बंधारा नं.२- ५० लक्ष ७७ हजार रुपये, स्मशानभूमी बांधणे १० लक्ष रुपये, निमराज महाराज जलकुंभ १५ लक्ष रुपये, अलभर वस्ती बंधारा १५ लक्ष रुपये, दलितवस्ती विविध विकास कामे ३९ लक्ष रुपये,
ढवळगाव गावांतर्गत काँक्रिटीकरण १० लक्ष रुपये, अरणगाव येथे रामा ६७ ते अरणगाव लबडेवस्ती रस्ता २ कोटी ७ लक्ष रुपये, येळपणे येथे- खंडोबा मंदिर जवळ सिमेंट बंधारा ४२ लक्ष ७१ हजार रुपये, रडी डोह सिमेंट बंधारा १ कोटी २७ लक्ष रुपये, येळपणे ते गावडेवस्ती रस्ता १ कोटी २६ लक्ष रुपये, खंडोबा मंदिर सभामंडप १० लक्ष रुपये,
माठ येथे मारुती मंदिर ते स्मशानभूमी रस्ता काँक्रिटीकरण १० लक्ष रुपये.अजनुज ते माळवाडी रस्ता १ कोटी ११ लक्ष रुपये, पेडगाव येथे स्मशानभूमी पेवर ब्लॉक १५ लक्ष रुपये, पेडगाव श्रीगोंदा रस्ता १ कोटी ५० लक्ष रुपये, पेडगाव मंडलअधिकारी कार्यालय २७ लक्ष रुपये, शेडगाव येथे सिमेंट बंधारा ५१ लक्ष ५० हजार रुपये, टाकळी कडेवळीत येथे सिमेंट बंधारा ७१ लक्ष ५५ हजार रुपये, कोकणगाव सिमेंट बंधारा कडवस्ती ४५ लक्ष ४४ हजार रुपये,
भावडी येथे सिमेंट बंधारा २७ लाख ६२ हजार रुपये, आढळगाव येथील सिमेंट बंधारा ३० लक्ष ८० हजार रुपये, तांदळी दुमाला भोसवस्ती येथे सिमेंट बंधारा ६० लक्ष ५९ हजार रुपये, तांदळी दुमाला वाघजाई रस्ता ८ लक्ष रुपये, घुगल वडगाव येथे सिमेंट बंधारा १५ लाख रुपये, बेलवंडी कोठार येथे बेलवंडी कोठार ते गायराण रस्ता १ कोटी १६ लक्ष रुपये, बेलवंडी कोठार ग्रामपंचायत कार्यालय लोकार्पण १० लक्ष रुपये, घोटवी ते रानमळा रस्ता १ कोटी ४३ लाख रुपये,
स्मशानभूमी सुशोभिकरण करणे ५ लक्ष रुपये. निंबवी ते पांडवगिरी रस्ता १ कोटी ०९ लक्ष रु, पिंपळगाव पिसा ते विष्णूची वाडी रस्ता १ कोटी ०९ लक्ष रुपये, पिंपळगाव पिसा- रेणुकामाता मंदिर रोड पेव्हरब्लॉक- ८ लक्ष रु, विसापुर- प्रजिमा ५६ ते शिंदेवाडी रस्ता १ कोटी ८९ लक्ष रु, सारोळा सोमवंशी – सिमेंट साठवण बंधारा (संगम) ३ कोटी ६९ लक्ष रु, चांभूर्डी – सिमेंट साठवण बंधारा (भुडकी) १ कोटी २५ लक्ष रु, बेलवंडी- बाजारतळ पेव्हरब्लॉक १० लक्ष रु, बेलवंडी- शेरी साठवण बंधारा १ कोटी १८ लक्ष रुपये.
व यापुढेही हा आलेख चढताच राहील असेही पाचपुते यावेळी म्हणाले. ओव्हरफ्लोचे आवर्तन चालू झाल्यानंतर पाणी माझ्यामुळे सुटले असे सांगत जे तालुकाभर फिरत होते तेच आता आवर्तन बंद झाल्यावर जबाबदारी आमदारांचीच म्हणतायेत. तर मग आवर्तनाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न कशासाठी असा सवालही पाचपुते यांनी उपस्थित केला. तालुक्यातील पाणी प्रश्नाची जबाबदारी आमदार या नात्याने १०० % माझीच आहे.
पाणी प्रश्नाबाबत मी सदैव तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. व भविष्यातही करतच राहील. परंतु धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यामुळे तालुक्याला सगळीकडे पाणी भेटले नाही ते धरणक्षेत्रात पाण्याची आवक होताच सर्वाना मिळेल याचे नियोजन केले आहे.
तालुक्यातील पाण्याची जबाबदारी मी यापूर्वीही प्रामाणिकपणे पार पाडली आहे आत्ताही पाडत आहे व यानंतर हि पाडत राहील व तालुक्यातील विकास कामेही अशीच जोमाने चालू राहतील. २०२४ मध्ये अनेक स्वयंघोषित मोठे पुढारी आमदार होण्याचे स्वप्न पाहतायेत यावर विचारले असता पाचपुते म्हणाले की तालुक्यातील जनता सुज्ञ असून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे
हे खरे असेल तर ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी सर्वांनी जोमाने तयारीला लागावे. तालुक्यातील मायबाप जनतेच्या बळावर २०२४ ची कुस्ती देखील मी निकाली काढल्याशिवाय राहणार नाही. कारण सेटलमेंट करण्याचा माझा धंदा नाही असे कोणाचेही नाव न घेता आ.पाचपुते यांनी सांगितले.