‘काही लोकं जाणीवपूर्वक कारखान्याबाबत चुकीच्या बातम्या प्रसारीत करतात’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ या गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख २ हजार ५०७ मे.टन ऊसाचे गाळप केले आहे.

तसेच कारखान्याने २ हजार १०० रुपया प्र.मे.टन याप्रमाणे पहिला हप्ता वेळेत शेतकऱ्यांना दिलेला आहे . उर्वरीत अंतीम पेमेंट देखील ऊस उत्पादकांना त्वरीत अदा करण्यात असून त्याचीही तरतुद करण्यात आलेली आहे . कारखान्याच्या आर्थिक अडचणींबाबत काही लोकांकडून हेतूपुरस्सर चुकीच्या बातम्या प्रसारीत केल्या जातात अशी टीका कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना कारखाना कारभाराची पुर्ण खात्री असल्यामुळे त्यांचा विश्वास आहे. स्व. बापूंच्या विचाराने व संस्काराने कारखान्याची वाटचाल चालू असल्यामुळे सभासद संचालक मंडळ शेतकऱ्यांचा विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे १४ कोटी रुपयांचे ऊस पेमेंट वर्ग करणेत येत आहे .

नागवडे कारखान्याने सन २०२०-२१ गळीत हंगामामधील ऊस तोड वाहतुक मजूर व मुकादमांचे बक्षिस व कमिशन सह सर्व १६ कोटी ५४ लाख रुपये अदा कलेले असुन कामगारांचे पगारही नियमीत होत आहेत. येणाऱ्या गळीत हंगामात कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालवून ” जास्तीत जास्त गाळप करणार आहे .

त्यामध्ये कसलीही अडचण येणार नाही . त्यामुळे कारखान्याच्या कारभाराबाबत कुणीही चिंता करु नये असेही नागवडे यांनी म्हटले आहे .

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24