कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जयपूरमधील राजस्थान विधानसभेमध्ये एका संसदीय परिसंवादामध्ये भाग घेतला होता.

तिथे हलक्या फुलक्या वातावरणामध्ये गडकरींनी जोरदार राजकीय टोलेबाजीही केली. कुणी मंत्री न बनल्याने दु:खी, तर कुणाला खुर्ची जाण्याची भीती वाटत आहे, असा टोला गडकरी यांनी लगावला.

नितीन गडकरी यांनी राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या उलथापालथीवर कुणाचेही नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले, समस्या सगळ्यांसोबत आहे. पक्षात आहे आणि पक्षा बाहेरही आहे.

आजच्या परिस्थितीत प्रत्येकजण दुःखी आहे. कुणी मंत्री न बनल्याने दुःखी आहे. तर मुख्यमंत्री कधी खुर्ची जाईल, या भीतीने दु:खी आहेत.

राजस्थान विधानसभेमध्ये संसदीय लोकशाहीवरील सेमिनारला संबोधित करताना गडकरी यांनी अनेकदा राजकीय चिमटे काढले. मात्र त्यांनी यादरम्यान, कुणाचेही नाव घेतले नाही.

यावेळी गहलोत सरकारलाही त्यांनी चिमटा काढला. गडकरी म्हणाले, आमदारांना मंत्री न बनल्याचं दुःख आहे. तर मंत्री चांगलं खातं न मिळाल्याने दुःखी आहे.

ज्याच्याकडे चांगलं खातं आहे ते मुख्यमंत्री न बनल्याने दुःखी आहेत. तर मुख्यमंत्री हे पदावरून हटवण्यात आल्याच्या भीतीने दुःखी आहेत.

गडकरी यांनी राजकारणात येणाऱ्या उतार-चढावांबाबत सांगितले की, एकदा नागपूरमध्ये त्यांच्या एका काँग्रेसमधील मित्राने त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते; मात्र मी विचारसरणीशी तडजोड केली नाही.