विहिरीत पडलेल्या त्या बिबट्या सोबत झाले असे काही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- भक्ष्याच्या शोधात विहिरीत पडलेल्या एक वर्षाच्या बिबट्याला सहीसलामत बाहेर काढल्याने उपस्थित शेतकर्यांनी वनविभागाच्या या कामगिरीचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले.

तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भाऊसाहेब हारदे यांच्या ४० फूट खोल विहिरीत बुधवारी रात्री हा बिबट्या पडला होता. गुरूवारी सकाळी विहीरीतील मोटरपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतक-याला विहिरीच्या भिंतीवर असलेल्या लोखंडी अँगलवर काकडत बसलेला बिबट्या दिसला.

या घटनेची खबर परिसरात पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.विहीरीत बिबट पडल्याची माहिती मिळताच प्रभारी वनक्षेत्रपाल सचिन गायकवाड, वनपाल भगवानसिंग परदेशी,

वनरक्षक निलेश कोळी, वनविभागाचे कर्मचारी ताराचंद गायकवाड, प्रमोद कोहकडे, सुनील अमोलीक यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीने विहीरीत पिंजरा सोडला. ४० फूट खोल विहिरीमध्ये कुडकुडत बसलेला बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24