अहमदनगर Live24 टीम, 27 जून 2021 :- घरी जात असलेल्या एका महिलेला दुचाकी वरुन आलेल्या अज्ञात चोरांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना शहरात घडली आहे.
विशेषबाब म्हणजे भरदिवसा शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हि घटना घडली आहे. सविता गणेश शेलार (वय ४१) यांनी याबाबत तोफखाना ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
त्यावरून तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेलार या गुलमोहर रोड परिसरात गेल्या होत्या.
पार्लरचे काम आटोपून दुचाकीवरून घरी जात असताना बी एस.एन.एल. कार्यालयासमोर कलानगर येथे पोहचले असता पाठीमागून एका काळया रंगाचे मोटरसायकल वरून आलेल्या चोरांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण ओढून नेले.
चोरटे हे मोटरसायकलवर रामकृष्ण कॉलनीच्या दिशेने जोरात निघून गेले. चोरट्याने तोंडाला मास्क लावले होते.
५७,०००/- रु. कि. एक सोन्याचे १९ ग्रॅम १२० मिली वजनाचे गंठण चोरून नेल्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहे