अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-राजकीय व सामाजिक वाटचालीत नाना ती पदे अनेकांच्या नशीबी येतात.
मात्र हे पद मिळण्यापाठीमागे आई-वडिलांचे, मित्रपरिवारांचे व गणगोत्यांचे आशीर्वादाचे पाठबळ असते.याचा जाणिवेतून मनपा स्थायीचे सभापती मनोज कोतकर यांनी आपले संवेदनशीलतेचे दर्शन घडविले.
दोन दिवसात स्थायी समिती पदाचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्श्वभूमीवर कोतकर यांनी आई-वडिलांना, मित्रपरिवार व नातेवाईकांना आपण भूषवित असलेले पद आणि त्या कामाची ओळख व्हावी,
यासाठी महापालिकेत त्यांना घेऊन आले व आपल्याला मिळालेल्या खुर्चीवर काही काळासाठी वडिलांना बसविले. यावेळी उपस्थित सर्वजण भावूक झाले. सभापती मनोज कोतकर हे शेतकरी कुटुंबातील तरुण आहेत.
वडिलांनी शेतीबरोबरच बैलगाडीतून नागरिकांना पाण्याचे वाटप करण्याचे काम केले व आजही करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वसा पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय त्यांनी यावेळी घेतला.
सर्वांच्या सहकार्यातून सामाजिक कार्य सुरू करुन नगरसेवक पदाचा बहुमान मिळविला. त्यानंतर स्थायी समितीच्या पदावर सर्वांच्या आशीर्वादातून निवड देखील झाली. दोन दिवसानंतर सभापतीपदाची मुदत संपत आहे.
यानिमित्त आपण करत असलेल्या कामाची आई वडिल व नातेवाईकांना माहिती व्हावी यासाठी त्यांच्या सोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.