अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्याची उपराजाधी नागपुरात एक धक्कादायकबाब उघड झाली आहे. एका 64 वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा होत नव्हता. मात्र, अखेर या हत्येचा उलगडा झाला आहे.
मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीने केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
लक्ष्मण मलिक आणि 31 वर्षीय पत्नी या दोघांमध्ये मुलाच्या ताबा घेण्यावरून वाद होता. या वादातून त्यांच्या खडाजंगी होत असे. त्यानंतर पतीचा काटा काढण्याचा पत्नीने कट रचल्याचे पुढे आले आहे.
दोघांमध्ये वाद असला तरी मात्र दोघांमध्ये संवाद सुरु होता. 8 मार्चला घटनेच्या दिवशी लक्ष्मण मलिक यांची हत्या करण्याच्या उद्देशानेच 31 वर्षीय पत्नीने गोकुळपेठ येथून रजत संकुल येथील लक्ष्मण मलिक सध्या वास्तव्यास असलेल्या फ्लॅटवर आली.
तिने फ्लॅटवर येवून मोबाईलवर काही अश्लील चित्रफीत दाखवत “कुछ नया करते है” असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. यावर विश्वास ठेवत लक्ष्मण मलिक यांना खोलीत नेले.
यावेळी स्वातीने सोशल मीडियावर उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांचे हात आणि पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर तिने सोबत आणलेल्या धारधार चाकूने लक्ष्मण मलिक यांचा गळा चिरून खून केला.
त्यानंतर स्वतीन घटनास्थळावरून पोबारा झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला लक्ष्मण मलिक यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना समजली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले. मृतकाचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा खुलासा झाला.
मृतक मलिक यांनी तब्बल पाच महिलांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी प्रत्येक महिलेला चौकशीसाठी बोलावले. यापैकी पाचवी पत्नी स्वातीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
त्यावरून पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी स्वातीची कडक चौकशी केली. तेव्हा तिने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याची कबुली दिली