वाळू तस्करांच्या सुसाट गाडीला सोनई पोलिसांचा ब्रेक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :-  रात्रीचा फायदा उठवत वाळूची अवैध वाहतुक करत असलेल्या टेम्पोसह दोन आरोपीस सोनई पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई सोनई-कांगोणी रस्त्यावर करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनई-कांगोणी रस्त्यावर पोलीस पथकाने छापा टाकून चोरटी वाळू वाहतुक करणारा

टेम्पो सह आरोपी सचीन रामदास माळी व विक्रम सुभाष माळी (दोघे रा. मांजरी ता.राहुरी) यांना अटक केली आहे.एक लाख रुपये किंमतीचा टेम्पो व पाच हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मृत्यूंजय मोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार एच. एम. गर्जे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24