दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सोनार पिता-पुत्रास अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  मुंबई येथील डायमंड, सोने चांदी व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूरच्या सोनार पिता-पुत्राविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला होता. त्यांना पोलिसांनी अटक केली असून १५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दिनेश प्रकाश मेहता (वय ४७, रामकुटीर, सरोजिनी रोड, विलेपार्ले, मुंबई) यांनी याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात फिर्याद दाखल केली. त्यात म्हटले होते, १२ जानेवारी ते ५ एप्रिल २१ या काळात

श्रीरामपूर शहरातील वाॅर्ड नंबर दोन येथील वैष्णवी अलंकार गृहचे मालक अक्षय बाळासाहेब डहाळे व बाळासाहेब विश्वनाथ डहाळे यांनी मुंबई येथील व्यापारी दिनेश प्रकाश मेहता यांच्याकडून १ कोटी ९८ लाख ६ हजार ७५९ रुपयांचे सुवर्णालंकार व डायमंड अलंकार खरेदी केला. अलंकाराच्या रक्कमेची दिनेश मेहता यांनी अक्षय डहाळे

व बाळासाहेब डहाळे यांच्याकडे मागणी केली. परंतु मेहता यांना रक्कम अथवा अलंकार दिले नाही. उलट तुला जे करायचे ते कर, तुझे सोने व डायमंड अलंकार आम्ही देणार नाही, पैसेही देणार नाही, असा दम दिला.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सानप, उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी, बिरप्पा करमल, किशोर जाधव, राहुल नरवडे, सुनील दिघे, रघुनाथ कारखेले,

राहुल गायकवाड आदींच्या पथकाने सर्वत्र कसून शोध घेत बाळासाहेब डहाळे यांना रावळस पिंपरी, ता. निफाड, तर अक्षय डहाळे यास उमरखेड येथून ताब्यात घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24