Sony Bravia TV : मागणी जास्त असल्याने सर्वच कंपन्यांनी आपल्या स्मार्ट टीव्हीच्या किमतीत वाढ केली आहे. सॅमसंग, सोनी,LG या लोकप्रिय स्मार्ट टीव्ही कंपन्या आहेत. इतर कंपन्यांच्या टीव्हींपेक्षा या टीव्हीच्या किमती जास्त असतात.
जर तुम्ही 43 आणि 50 इंच सोनी टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आहे. तुम्ही आता Amazon सेलमधून हे टीव्ही खरेदी करू शकता. यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होईल. जाणून घ्या ऑफर.
सोनी ब्राव्हिया 43 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी Google TV KD-43X75L
किमतीचा विचार केला तर या 43 इंच टीव्हीची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही तो 31% डिस्काउंटनंतर 48,440 रुपयांना सहज खरेदी करू शकता. कंपनी या टीव्हीवर 5,000 रुपयांची स्वतंत्र बँक सवलतही देत आहे. तुम्हाला एक्सचेंज ऑफरद्वारे स्मार्टटीव्हीची किंमत 2560 रुपयांनी कमी करता येईल.
हा टीव्ही 2348 रुपयांपासून सुरु होणाऱ्या EMI वर तुम्ही खरेदी करू शकता. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टीव्हीमध्ये 178 डिग्रीच्या व्ह्यूइंग अँगलसह 60Hz च्या रिफ्रेश रेटसह डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनी या टीव्हीमध्ये 20 वॉट साउंड आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ देत आहे.
सोनी ब्राव्हिया 50 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी Google TV KD-50X64L
किमतीचा विचार केला तर या सोनी स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 74,990 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही तो ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमधून 29% सवलतीसह खरेदी करू शकता. या डिस्काउंटनंतर स्मार्ट टीव्हीची किंमत 52,990 रुपयांपर्यंत कमी होत आहे.
तसेच बँक ऑफरद्वारे तुम्हाला टीव्हीची किंमत 5 हजार रुपयांनी कमी करता येईल. हा स्मार्टटीव्ही 2560 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह देखील खरेदी करता येऊ शकतो. फीचर्सबाबत सांगायचे झाले तर, कंपनीने स्मार्टटीव्हीमध्ये 50-इंचाचा 4K अल्ट्रा HD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. तर त्याच वेळी, शक्तिशाली आवाजासाठी, तुम्हाला स्मार्टटीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओसह 20-वॉट स्पीकर सेटअप पाहायला मिळेल.