लाल कांदा म्हणून पेरणी केली पण लालऐवजी पांढरा कांदा उगवला ! अहमदनगर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार उघडकीस…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यात एका शेतकऱ्याने लाल कांदा म्हणून बियाणाची पेरणी केली. परंतु लालऐवजी पांढरा कांदा उगवला. त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक झाली.

कांदा बियाण्यात फसवणूक झालेल्या कंपनीचा परवाना रद्द करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा शेतकऱ्या समवेत राहुरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल,

असा इशारा अखिल भारतीय क्रांती सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांनी दिला आहे.या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे यांना पाठवण्यात आले.

या निवेदनात म्हटले तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी नितीन खांदे, रोहित शेटे, केंदळ बुद्रूक येथील शामसुंदर तारडे या शेतकऱ्यांच्या शेतात लाल कांदा ऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याने बियाणे फसवणूक झाल्याच्या लेखी तक्रारी तालुका कृषी अधिकारी,

राहुरी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात लाल कांदाऐवजी पांढरा शुभ्र कांदा निघाल्याचे आवश्यक आसताना मात्र कांदा बियाणे उगवण न झाल्याचे अहवालात दर्शवण्यात आल्याने संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले.

शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क व पत्र व्यवहार करून देखील या प्रकरणाला संबंधित अधिकाऱ्यांकडून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व कंपनीचे परवाने रद्द करावे, अशी मागणी मधुकर म्हसे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे केली.

अहमदनगर लाईव्ह 24