खरीप हंगामासाठी सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पेरण्या झाल्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी बळीराजा व्यथित तसेच चिंताग्रस्त झाला होता. अखेर वरुणराजाची कृपादृष्टी झाली आणि जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. यामुळे बळीराजावरील दुबार पेरणीचे संकट देखील टळले गेले.

यामुळे शेतकऱ्यांनी देखील पेरणीची कामे होते घेतली असून पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच जिल्ह्यात विविध भागात पडणार्‍या पावसामुळे खरीप हंगामासाठी सरासरीच्या तुलनेत 98 टक्के पेरण्या झाल्या आहेत.

यात 4 लाख 40 हजार हेक्टर पेरणीचे क्षेत्र असून झालेल्या पेरण्यामध्ये उडिद पिकाची 72 हजार हेक्टरवर पेरणी झालेली असून सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण 400 टक्के आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात पेरण्या झालेल्या पिकांची स्थिती उत्तम असून कोणत्याही पिकावर किड रोगाचा प्रादूर्भाव नसल्याचे सांगण्यात आले.

नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा असून सुरूवातीच्या पावसावर खरीप हंगामाची मदार असते. मात्र, काही वर्षात सुरूवाला चांगला पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील खरीपाचे नियोजननूसारच्या सरासरी क्षेत्र वाढत आढतांना दिसत आहे.

जिल्ह्यात सध्या 4 लाख 40 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून उस, कांदा लागवडी, फळबागा, भाजीपाला पिकांसह हे क्षेत्र 5 लाख 50 हजारांपर्यंत पोहचले आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागात झालेल्या दमदार पावसाने त्या पिकांना जीवदान मिळण्यासोबतच पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24