ताज्या बातम्या

Soyabin rates today maharashtra : अखेर शेतकऱयांना अच्छे दिन ! सोयाबीनचे दर वाढले…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील शेतकऱयांसाठी आनंदाची बातमी आहे कारण अखेर सोयाबीनचे दर वाढले आहेत,शेतकऱ्यांना शेती माल तारण योजनेचा लाभ घेऊन सोयाबीनची साठवणूक करावी लागली होती. (Soyabin rates today maharashtra)

मात्र, आता सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. बुधवारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सौद्यामध्ये 6 हजार 92 रुपये असा दर मिळाला आहे तर पोटलीत सोयाबीनला 5750 चा दर मिळाला आहे.

सोयाबीनचे दर कमी असतानाही आणि आता वाढल्यानंतरही शेतकऱ्यांनी सर्वकाही संयमाने घेतलेले आहे. दोन आठवड्यापूर्वी सोयाबीनला दर नव्हते तेव्हाही शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिला होता तर आता दर वाढूनही मोठ्या प्रमाणात आवक केली जात नाही.

सध्या दर वाढले असताना आवक वाढली तर याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठेचे गणित कळाले असून आता दर वाढले तरी टप्प्याटप्प्यानेच सोयाबीनची आवक केली जाणार आहे. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला तर त्याचा दरावर परिणाम हा होतोच.

पण यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन मालच रोखून धरला आहे. याबाबतचा उल्लेखही इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशने पशूसंवर्धन मंत्र्यांना लिहलेल्या पत्रातही केला आहे. आता दर वाढूनही शेतकरी सोयाबीनची अधिकच्या प्रमाणात आवक होऊ देत नाहीत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरात अणखीन वाढ होणार आहे.

मंगळावारच्या तुलनेत बुधवारी सोयाबीनच्या दरात 150 रुपयांनी लातूरच्या बाजार समितीमध्ये वाढ झाली होती तर आवक केवळ 15 हजार पोत्यांची होती. सोयाबीन विक्रीची गडबड आता शेतकऱ्यांना नाही तर पुरवठा कमी होत असल्याने प्रक्रिया उद्योजकांना गरज राहिलेली आहे. वाय दिवसाला सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ऊंचावल्या आहेत. मात्र, साठवणूक केलेल्या सोयाबीनला ऊन देऊन त्याच्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 10 ते 12 टक्केवर आणणे गरजेचे आहे. तर योग्य दरही शेतकऱ्यांना मिळणार आहे.

जाणून घ्या राज्यातील आजचे दर Soyabin rates today maharashtra

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
17/11/2021
लासलगाव क्विंटल 1038 4000 6400 5781
लासलगाव – विंचूर क्विंटल 810 3000 6141 5850
माजलगाव क्विंटल 1576 4500 5750 5500
राहूरी -वांभोरी क्विंटल 26 5300 5700 5500
संगमनेर क्विंटल 5 5500 5500 5500
उदगीर क्विंटल 6600 5800 5860 5830
कारंजा क्विंटल 7000 5150 5775 5525
अचलपूर क्विंटल 4850 4500 5200 4800
परळी-वैजनाथ क्विंटल 900 4500 5869 5700
सेलु क्विंटल 228 4851 5911 5781
रिसोड क्विंटल 8500 5450 6325 5850
लोहा क्विंटल 44 5651 5980 5850
राहता क्विंटल 37 5500 5901 5825
वडवणी क्विंटल 4 5300 5301 5301
धुळे हायब्रीड क्विंटल 3 5000 5836 5500
सोलापूर लोकल क्विंटल 219 4800 5945 5840
हिंगोली लोकल क्विंटल 1000 5500 6050 5775
कोपरगाव लोकल क्विंटल 448 4000 6251 6015
अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 44 4601 5630 5191
लातूर पिवळा क्विंटल 15540 5650 6135 6000
जालना पिवळा क्विंटल 5722 4000 5800 5650
अकोला पिवळा क्विंटल 4222 5000 5900 5500
परभणी पिवळा क्विंटल 125 5500 5900 5700
आर्वी पिवळा क्विंटल 665 4600 6100 5400
हिंगणघाट पिवळा क्विंटल 6256 5200 6000 5520
पैठण पिवळा क्विंटल 5 5560 5560 5560
धामणगाव -रेल्वे पिवळा क्विंटल 2058 4200 5700 5100
वर्धा पिवळा क्विंटल 272 5000 5650 5450
भोकर पिवळा क्विंटल 319 4000 5850 4925
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 767 5000 5800 5400
मलकापूर पिवळा क्विंटल 1670 4700 5900 5260
सावनेर पिवळा क्विंटल 29 3800 5200 5000
गेवराई पिवळा क्विंटल 417 4200 5555 5400
परतूर पिवळा क्विंटल 133 5152 5950 5941
गंगाखेड पिवळा क्विंटल 68 5800 6000 5900
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 115 4500 5700 5300
धरणगाव पिवळा क्विंटल 28 5200 5875 5450
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 40 5486 5881 5700
चाकूर पिवळा क्विंटल 110 5300 5732 5628
मुखेड पिवळा क्विंटल 59 5700 5750 5700
हिमायतनगर पिवळा क्विंटल 90 4900 5000 4950
मुरुम पिवळा क्विंटल 610 4700 5850 5275
उमरगा पिवळा क्विंटल 115 5000 5800 5760
बसमत पिवळा क्विंटल 917 5245 6005 5827
मंगळूरपीर – शेलूबाजार पिवळा क्विंटल 1262 4500 5815 5600
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 131 4800 5961 5500
पांढरकवडा पिवळा क्विंटल 140 5000 5600 5400
बाभुळगाव पिवळा क्विंटल 945 4800 5750 5300
काटोल पिवळा क्विंटल 191 3300 5700 5300
पुलगाव पिवळा क्विंटल 100 4950 5725 5450
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 5290 5450 6025 5600

 

Ahmednagarlive24 Office