ताज्या बातम्या

सोयाबीनचे दर स्थिर; शेतकऱ्यांसह व्यापारीही चिंतेत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022  Krushi news :- गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचे उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण सबंध हंगामात सोयाबीनचे दर हे काही टिकून राहिलेले नाहीत.

सोयाबीन खरेदी-विक्रीमधून शेतकऱ्यांचे नुकसान इथपर्यंत ठिक होते. पण गेल्या महिन्यात दरात झालेल्या चढ-उताराचा अंदाज व्यापाऱ्यांनाही आला नाही.

उत्पादन घटले त्यामुळे काही शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवून भविष्यात दरवाढ होईल ही शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तर दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात 6 हजार 200 रुपये क्विंटल दर होता

नंतर जानेवारी च्या अंतिम टप्प्यात दरवाढ झाली सोयाबीनला विक्रमी असा 7 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. भाव मिळत असला तरी शेतकऱ्यांनी मात्र सोयाबीनची जास्त अवाकच होऊ दिली नाही.

त्यामुळे हे दर टिकून राहिले.तर सोयाबीनला सध्या 7 हजार रुपेय दर मिळत आसून दर स्थिर झाले आहेत. शिवाय काही दिवसांनी उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली

तर पुन्हा दर घसरतील या धास्तीने शेतकरी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढत आहे. मागील 10 दिवसात सोयाबीन दरातील चढ-उतार पाहता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री केलेलीच फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Ahmednagarlive24 Office