अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगर शहराच्या स्थापना दिनी जुन्या महानगरपालिकेतील मनपा आरोग्य अधिकार्यांच्या दालनामध्ये आमदार संग्राम जगताप समर्थकांनी धुडगूस घातला.
जगताप आणि त्यांचे राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते यांना महापालिकेवर हल्ला करत तोडफोड करायची होती.त्यांनी खुर्च्यांची आदळा आदळ केली. बाटल्या फोडण्यासाठी उगारल्या. दहशत निर्माण केली. कोरोना काळात गुंडांचा जमाव गोळा करून मनपावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता.
या घटनेतून नगर शहरात संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती होते की काय अशी तणावपूर्ण परिस्थिती मनपात निर्माण झाली होती,असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
जुन्या महानगरपालिकेमध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास किरण काळे हे ब्लॉक कांग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला,क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत लसीकरणाच्या शहरातील सुरू असणाऱ्या गोंधळाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी त्या ठिकाणी आधीपासूनच आरोग्य अधिकार्यांच्या दालनामध्ये जगताप आपल्या गुंड कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने याठिकाणी एकत्रित केले होते.त्याआधीच नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मनपात बाचाबाची झाल्याची चर्चा शहरात सुरू होती.
घटनेची माहिती देताना किरण काळे म्हणाले की, आम्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दालनात प्रवेश केल्यानंतर आधीपासून सुरू असणारी चर्चा पाहून वाट पाहणे पसंत केले. मात्र काही वेळात आमदार जगताप यांच्या चिथावणी वरून त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी काळे यांच्या वर हल्लाबोल सुरू केला.
चार-पाच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना जगताप यांचे साठ-सत्तर गुंड कार्यकर्ते यांनी धरा रे, मारा रे अशी अरेरावी सुरू केली. जगताप यांनी त्यात तेल ओतायचे काम कले. त्यामुळे त्यांच्या गुंडांचा उत्साह अधिक वाढला. खुर्च्यांची आदळा आदळ सुरू झाली.
बाटल्या फोडण्याचा प्रयत्न झाला. बाचाबाची सुरू झाली. मी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना एस. एम. एस. करून या ठिकाणी तातडीने पोलिस बळ पाठविण्याची विनंती केली. काही वेळातच त्या ठिकाणी पोलिस पोहोचले.
पोलिसांनी तत्परता दाखवली मुळे पुढे घडणारा मोठा अनर्थ टळला. अन्यथा आमदार जगताप आणि त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी नगर शहराच्या स्थापना दिनी नगर शहराला पुन्हा एकदा एसपी ऑफीस हल्ला प्रकरणाची पुनरावृत्ती करत शहरात दहशत माजवण्याचा प डाव यशस्वी केला असता.
आम्ही पोलीस यंत्रणेचे त्यांनी दाखविलेल्या तत्परतेने बद्दल आभारी आहोत. यावेळी घडलेला प्रकार आरोग्य अधिकार्यांच्या दालनात असणाऱ्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. वेळेस ते पुढेच ताब्यात घेण्याची गरज आहे अन्यथा पुरावा नष्ट केला जाऊ शकतो.
त्यामुळे सदर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन त्याआधारे घडल्या प्रकाराबद्दल चौकशी करण्याची मागणी काळे यांनी केली आहे. कैरो, बगदादशी तुलना होणाऱ्या नगर शहराची तुलना बिहारशी होते हे शहराचे दुर्दैव या आहे.
त्याला शहराचे लोकप्रतिनिधी यांची संस्कृती आणि गुंड प्रवृत्तीची विचारसरणी कारणीभूत आहे. मात्र आता गुंडगिरीचा अतिरेक होतो आहे. अशा प्रकारच्या घटना जर लोकप्रतिनिधीच करत असतील तर सामान्य माणसाने जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरामध्ये लसींची पळवापळवी सुरू आहे.
आमदाराच्या पीएनने लस पळवल्याचा व्हिडिओ भाजप नेते सुवेंद्र गांधी यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ मनपा आयुक्त, आरोग्य अधिकारी यांना दिसत नाही का ? की दिसून सुद्धा ते त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाहीत ? सदर प्रकरणी ज्या आरोग्य केंद्रावरून आमदार जगताप यांच्या पीएने लसी घेऊन गेला त्याच्या वरती मनपाने स्वतः तातडीने गुन्हा दाखल करण्याची गरज असताना सुद्धा तो अद्यापही केलेला नाही, असे यावेळी काळे म्हणाले.
नगर शहरातील सर्वसामान्य हजारो नागरिक हे लसीपासून वंचित आहेत. पहाटे पासून ते रांगांमध्ये उभे आहेत. उन्हात लसीसाठी ताटकळत आहेत. त्यांना लस मिळत नाही. मात्र शहरातील सर्वच केंद्रांवरून आमदार त्यांच्या पंटर लोकांना पाठवून लसी घेऊन जात आहेत
आणि त्यांचे रात्री अपरात्री शहरातील त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हॉटेलवर आणि आयुर्वेद महाविद्यालयाच्या आवारामध्ये लसीकरण करत आहेत. जर लोकप्रतिनिधींनी असे वर्तन केले तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना लस कशी मिळणार ? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.
दिवंगत अनिलभैय्या राठोड यांची आठवण झाली :- दिवंगत अनिलभैय्या आज हयात असते तर त्यांनी सर्वसामान्यांच्या लसीकरणाच्या प्रश्नावर निश्चितपणे आवाज उठवला असता. मात्र ते नाहीत हे दुर्दैव असले तरी देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनिलभैय्यांची सर्वसामान्य नागरिकांसाठी असणारी सेवा करण्याच्या विचारांची जपणूक आम्ही करत आहोत.
निर्भिडता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे काँग्रेसचे ब्रीद असून नगरकरांना विकासाबरोबरच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम देखील काँग्रेस निर्भिडपणे यापुढेही करत राहील, असे काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. काँग्रेसवर स्टंटबाजीचा आरोप करणं ही राष्ट्रवादी आमदारांची जुनी सवय सत्य घटनेला,
अन्यायाला वाचा फोडली की आमदार त्याच्यावर हा काँग्रेसचा हा स्टंट आहे, असं म्हणतात. ही त्यांची जुनी सवय आहे. परंतु स्टंट म्हणून संबोधल्याने वास्तव बदलत नाही. वास्तव भयावह असले तरी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहत अन्यायाला वाचा फोडण्याची हिम्मत काँग्रेस पक्षामध्ये आहे हे आमदारांनी विसरू नये, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.