अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- एकतर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, कोरोना या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अत्यंत दैन्य अवस्था झाली आहे आणि परत ही वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण जोमात अन शेतकरी कोमात अशी अवस्था झाली आहे.
थकबाकीच्या वसुलीपोटी महावितरणने कृषी पंपांची वीज खंडित करण्याचा धडाका लावला आहे.मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगर जिल्ह्यात कृषी पंपांची सुमारे पाच हजार कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे वसुली मोहीम सध्या महावितरणने चांगली सुरू केली असून, त्याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे.
जर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यातच आज ही परिस्थिती आहे तर मग इतर ठिकाणी काय असेल याबाबत कल्पना न केलेली बरी.
शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी ऊर्जा विभागाने काहीशी सूट दिलेली आहे. परंतु, शेतकऱ्यांची पिके ऐन जोमात असताना वीज खंडित करण्याची मोहीम अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
आजमितीला जिल्ह्यातील विविध गावांमधील जवळपास ७० टक्के विद्युत रोहित्रे बंद आहेत त्यामुळे ऊस, कांदा, फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत .