अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी अनेक विकासकामे सुरू केलेली असून, या विकास कामांमुळे शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचे रुप पालटू लागले आहे.
डॉ. घुले हे विकासकामांचा आढावा प्रत्यक्ष भेट देऊन घेत आहेत. अशाच भेटी दरम्यान त्यांच्यातील संस्काराचे दर्शन दिसून आले. त्यांना औक्षवण केल्यानंतर त्यांनी संबंधित महिलेचे दर्शन घेतल्याचे छायचित्र सध्या सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले आहे.
शेवगाव पंचायत समिती सभापतीची धुरा डॉ. क्षितीज घुले यांनी स्वीकारल्यापासून ग्रामीण भागातील प्रश्न प्राधान्याने सोडवून विकास कामे सुरू करण्यात आलेली आहेत. या विकास कामांमुळे ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घुले नेहमीच अधिकाऱ्यांकडून घेत आहेत.
परंतू अधिकाऱ्यांवर विसंबून न रहाता ते प्रत्यक्ष कामांना भेटी देऊन पाहाणी करत आहेत.तालुक्यात सध्या सुरू असलेल्या घरकुल कामांना कामांना भेटी देऊन ते आढावा घेत आहेत. यामुळे विकासकामे वेगाने होऊ लागलेली आहे.या दौऱ्यात ते लाभार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.
त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणारे सभापती म्हणून त्यांच्याकडे पाहिले ज़ात आहे. सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी जनतेच्या मनात स्वत:विषयी आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे तालुक्याचे भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले ज़ात आहे.