Ahmednagar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यांच्यासह शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, विशेष विमानान आज शनिवारी (दि.८) जाणार आहेत.
या दौऱ्यात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ.प्रा.राम शिंदेंसह मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, मोहित कंबोज आदी भाजप नेत्यांचा या दौऱ्यात समावेश आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत आयोध्याच्या राम मंदिराच्या कामाची पाहणी करण्यात येणार असून, मुख्यमंत्री आयोध्येतील विविध भागांना भेट देणार आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयानंतर प्रभु श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापुजा केली जाणार असून, हा महापूजा केलेला धनुष्यबाण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व तालुक्यात फिरविण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोध्या दौऱ्याची तयार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु केली होती.
दिवे आगार येथील गणपती मुर्तीच्या चोरी प्रकारानंतर अधिवशेनाच्या कामकाजात शिवसेनेच्यावतीने गणपतीची आरती करुन सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. त्या शिष्टमंडळात शिवसेनेच्या १२ आमदारांसह भाजपाचे आ.राम शिंदे सहभागी होते.
त्यामुळे अधिवेशनातील गणपतीच्या आरती वेळी तुम्ही आमच्या सोबत होता, आता आयोध्याच्या राम मंदिरच्या आरतीला भाजपचे राम शिंदे असलेच पाहिजे, असा विशेष आग्रह त्यांनी धरला. आयोध्या दौऱ्यासाठी विशेष विमान जाणार आहे.
त्या विमानात राम शिंदे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा हा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचामानला जातो आहे. आगामी काळात निवडणुका आहेत. यातच शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आता शिंदे यांची शिवसेना आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी प्रभू श्रीरामांच्या चरणी दर्शनासाठी गेली आहे.