ताज्या बातम्या

येणाऱ्या वर्षाच्या स्वागताला आपल्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- आज नववर्षाची पूर्व संध्या म्हणजेच 31 डिसेंबरचा दिवस!प्रत्येकालाचं नवीन वर्षाची उत्सुकता असते. सरत्या वर्षाला निरोप देऊन प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे वाटचाल करत असतो.(Welcome to New Year)

2021 या वर्षामध्ये भारतावरचं नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचं संकट होतं. मात्र, आता देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आशा आहे की, 2022 मध्ये कोरोना विषाणू पूर्णता नष्ट होईल आणि तुमचं हे वर्ष सुखी व आनंदाने जाईल.

आज तुम्ही आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना फेसबूक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, मेसेंजर यांच्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.

पुन्हा एक नवं वर्ष

पुन्हा एक नवी आशा

तुमच्या आयुष्याला मिळो

पुन्हा एक नवी दिशा

नवी स्वप्न, नवी क्षितिजं

सोबत माझ्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान,

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या शुभेच्छा छान!

नूतनवर्षाभिनंदन!

चला नवीन वर्षाचे स्वागत करुया

जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवूया

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल

या नव्या वर्षात येणाऱ्या बदलांना सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी ऑल द बेस्ट !

येवो सुख, समृद्धी तुमच्या अंगणी

वाढो आनंद तुमच्या जीवनी

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Ahmednagarlive24 Office