अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- नुकत्याच टोकियो येथे पार पडलेल्या ऑलंपिक जागतिक स्पर्धांमध्ये तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक मिळविल्याबद्दल अहमदनगर शहर क्रीडा काँग्रेसच्या वतीने नागरिकांना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
शहर क्रीडा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय खेळाडू प्रवीणभैय्या गीते पाटील यांच्या पुढाकारातून नागरिकांना पेढे भरविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये क्रीडा काँग्रेसचे सचिव मच्छिंद्र साळुंखे, खजिनदार नारायण कराळे, संघटक प्रसाद पाटोळे, सरचिटणीस अदिल सय्यद, क्रीडा प्रशिक्षक बाबु सकट सर, सुरज गुंजाळ, आदित्य क्षिरसागर,
सरफराज सय्यद, दिपक चांदणे, जाहीद शेख, आदित्य बर्डै, मनोज उंदरे, आदित्य यादव यांच्यासह काँग्रेस क्रीडा विभागाचे पदाधिकारी, क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक,क्रीडा शिक्षक आदी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना प्रवीण गीते पाटील म्हणाले की, ४१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारताला बाराव्यांदा ऑलिम्पिक मध्ये हे मेडल मिळाले आहे. हॉकी हा या देशातील एक लोकप्रिय खेळ आहे.
नगर शहरामध्ये देखील हॉकी मोठ्या प्रमाणात खेळला जातो. ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला मिळालेले घवघवीत यश हे क्रीडापटूंना निश्चित आनंद देणारे आहे.
म्हणूनच आम्ही आज नगर शहरातील नागरिकांना पेढे भरवीत हा आनंद काँग्रेस क्रीडा विभागाच्या वतीने साजरा केला आहे. नगर शहरात देखील हॉकी तसेच इतर सर्व खेळांना प्रोत्साहन देण्याचे काम,
त्याचबरोबर क्रीडापटू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक आदींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस क्रीडा विभागाच्या माध्यमातून महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते तथा क्रीडा मंत्री ना. सुनील केदार,
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या माध्यमातून सातत्यपूर्णपणे काम सुरू असून त्याला अधिक गती देण्याचे काम काँग्रेस क्रीडा विभागाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, असे यावेळी गीते म्हणाले.