अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- संशोधनातुन धक्कादायक माहिती समोर ! कोरोना व्हायरसचा असा होतोय फैलाव… दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे.
त्यातच कोरोना व्हायरसचे नवे नवे व्हेरिअंट्स चिंता आणखी वाढवत आहे. त्यातच आता एका संशोधनातुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोळ्यातल्या अश्रूंमधूनही कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनातुन करण्यात आला आहे.
शिंकण्याने, खोकण्याने तसेच एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाव्हायरसचा संसर्ग होत आहे. यामुळे मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करने गरजचे आहे. त्यातच आता नव्या संशोधनामुळे चिंतेत भर पडली आहे. डोळ्यातील अश्रूंमधूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतं, अशी धक्कादायक माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
अमृतसरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं याबाबतचे संशोधन केले आहे. कोरोनाची अर्थात कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांच्या अश्रूंद्वारेही कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंमध्येही सार्स -कोव्ह-2चे विषाणूचे अस्तित्व आढळून आलं आहे.
शिंकणे, खोकणे यातून उडणारे द्रव बिंदू यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. एखाद्या आजारामुळे कधीकधी ‘ऑक्युलर मॅनिफेस्टेशन अर्थात डोळ्यांनाही त्रास होतो. यामुळेच ताप, सर्दी झाली असेल तर डोळ्यांची जळजळ होते. डोळ्यातून पाणी येतं. अशी लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांच्या डोळ्यांद्वारे वाहणाऱ्या पाण्यातही कोरोना विषाणू असतात.
त्यामुळे त्याद्वारेही संसर्ग पसरू शकतो, असा निष्कर्ष या संशोधाद्वारे काढण्यात आला आहे. 100 हून अधिक रुग्णांचा अभ्यास करुन हे संशोधन करण्यात आले.