अहमदनगर जिल्ह्यातील ह्या हॉस्पिटलमध्ये स्पुटनिक व्ही लस उपलब्ध !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- रशियात संशोधन झालेली कोरोना प्रतिबंधक स्पुटनिक व्ही लस नगर जिल्ह्यात प्रथमच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. प्रचलित लसीमध्ये स्पुटनिक व्ही प्रभावी मानली जाते.

बुधवारपासून ( ८ सप्टेंबर) साईदीप हॉस्पिटल मध्ये ही लस उपलब्ध राहणार आहे अशी माहिती साईदीप हॉस्पिटलच्या वतीने देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीही साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून स्पुटनिक व्ही ही लस प्रथमच साईदीप हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

८ सप्टेंबर पासून रोज सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यन्त लस देण्यात येईल. या लसीच्या एका डोसची किंमत ११४५ रुपये तर दोन्ही डोसची एकत्र किंमत २२९० रुपये आहे.

पहिल्या डोसनंतर दुसरा डोस २१ व्या दिवशी घ्यायचा आहे. स्पुटनिक व्ही लसीचे भारतातच डॉ. रेड्डीज लेबोरेटरी मार्फत उत्पादन होत आहे. नागरिकांनी या लसीकरण सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office