‘या’ ठिकाणचा जनावरांचा आठवडे बाजार सुरू करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-  कोरोना संसर्गामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जामखेडमधील जनावरांचा आठवडे बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच इतर लहान मोठे व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

तेव्हा प्रशासनाने जामखेडचा जनावरांचा व आठवडे बाजार लवकरात लवकर सुरू करावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष मंगेश आजबे यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे केली आहे.

यात नमूद केले आहे की, जामखेड तालुक्यातील कष्टकरी, सर्वसामान्य शेतकरी व ज्यांचे हातावर पोट आहे अशा व्यक्तींसाठी शनिवारचा आठवडी बाजार अत्यंत महत्त्वाचा आहे.

मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. परंतु बाजार बंद असल्याने बाजारावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे खूप हाल होत आहेत.

त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता तरी जनावरांचा बाजार चालू करावा.

अशी मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. या निवेदनाची तातडीने दखल घेत तहसीलदार यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

अहमदनगर लाईव्ह 24