अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- नेवासे शहरात नगरपंचायत मार्फत कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य शक्यतेच्या अनुषंगाने आपण काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.
म्हणूनच शासनाने यासाठी नगरपंचायतीला उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले आहेत. नेवासे शहराचा मागील दोन्ही लाटेमधील रुग्णसंख्येचा आलेख बघता आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपण नगरपंचायत मार्फत १०० बेडचे सर्व सोयीसुविधा युक्त कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर उभारावे व नेवासकरांना कोरोनाच्या महामारीत दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात.
भाजप प्रशासनासोबत आहे. मात्र जर नगरपंचायतने नेवासकरांना आरोग्य विषयक सेवा देण्यासाठी कुचराई केली, तर मात्र शहर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मनोज पारखे यांनी दिला.
यावेळी ओबीसी मोर्चाचे युवक संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, भाजप शहर उपाध्यक्ष राजेश कडू, सरचिटणीस अप्पा गायकवाड, युवा मोर्चाचे प्रतीक शेजूळ, आकाश देशमुख, अमोल कोलते आदी उपस्थित होते.