अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- कोरोनाच्या माहामारीत साईबाबा संस्थानच्या माध्यमातून होत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद असून साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णांना साईनाथ रूग्णालयात शिफ्ट करून तेथे अद्यायावत उपचार करावेत.
तसेच साईबाबा सुपर रूग्णालय कोरोना व्यतिरीक्त ( नॉन कोविड) रूग्णांसाठी पुर्ववत सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रमेश गोंदकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याकडे केली आहे.
गोंदकर यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची भेट घेवून कोरोना रूग्ण आणी कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली.
कोरोनाच्या रूग्णांवर उपचार होण्याबरोबरच इतर रूग्णांवर तात्काळ उपचार होण्यासाठी संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णांना साईनाथ रूग्णालयात शिफ्ट करावे.
साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर ,नर्सेस ,स्टाफ़,वॉर्ड बॉय यांच्यासह सर्व कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाचा आरोग्य विमा उतरावा.
रूग्णालयातील रिक्त जागांवर अधिकारी व तज्ञ डॉक्टर ,वैद्यकीय संचालक ,वैद्यकीय प्रशासक यांच्या नेमणुका करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी केली.
निवेदनावर राष्ट्रवादीचे सुधाकर शिंदे, संदीप सोनवणे,महिंद्र शेळके, निलेश कोते, अमित शेळके, दीपक गोंदकर, राकेश कोते, चंद्रकांत गोंदकर, विशाल भडांगे, सुनील गोंदकर, राहुल कुलकर्णी, प्रकाश गोंदकर,
साई कोतकर, गणेश गोंदकर, अभिराज कोते, लखन वाकचौरे, अमोल सुपेकर, राहुल फुंदे, सचिन गव्हाणे, फरियाद शेख, शायद सईद, गंगाधर वाघ आदींच्या सह्या आहेत.