Business Idea : कमी गुंतवणुकीत कुठेही सुरु करा ‘हा’ व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई

Business Idea : सध्या नोकरी मिळणे खूप अवघड झाले आहे. कारण ट्विटर, ऍमेझॉन यांसारख्या दिग्ग्ज कंपन्याच आपल्या कामगारांना कामावरून काढून टाकत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे अनेकांना उदरनिर्वाहासाठी काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, आता काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

तुम्ही आता केटरिंगचा व्यवसाय सुरु करू शकता, विशेष म्हणजे यासाठी मोठ्या बजेटची गरज लागत नाही. हा असा व्यवसाय आहे कायम सुरु राहतो.

Advertisement

मार्केटची माहिती गरजेची

जर कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी मार्केटची माहिती गरजेची आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल ऑनलाइन आणि मित्रांमार्फत प्रसार करू शकता. त्यामुळे हळुहळू तुमच्याकडे ऑर्डर येतील. अनेक जण छोट्या पार्ट्यांमध्येही चांगला केटरर शोधत असतात.

अशी करा सुरुवात

Advertisement

विशेष म्हणजे तुम्हाला हा व्यवसाय कधीही आणि कुठेही सुरू करता येतो. तुम्हाला फक्त रेशन आणि पॅकेजिंगवर खर्च करावा लागेल. त्यासोबतच तुम्हाला भांडी, गॅस सिलिंडर आणि काही मजुरांची गरज भासेल. सुरुवातीला तुम्ही महिन्याला 25-50 हजार रुपये मिळतील. त्यानंतर तुम्ही लाखो रुपये कमवाल.