Business Idea : पूर्वी जंगलातून व इतर ठिकाणांहून मध गोळा केला जायचा. परंतु, आता मधमाशी पालन हा एक शेतीपूरक व्यवसाय बनला आहे. सध्या मार्केटमध्ये मधाची मागणी वाढली आहे.
वाढत्या मागणीमुळे अनेकजण मधमाशी पालनाचा व्यवसाय करू लागले आहेत. इतर व्यसायापेक्षा या व्यवसायात जास्त नफा मिळतो.सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदतही करीत आहे.
सरकार सध्या एमएसएमई या क्षेत्राकडे जास्त लक्ष देत आहे. औषधांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध वापरला जातो. मधमाशी पालनामध्ये कृषी आणि बागायती उत्पादन वाढवण्याची क्षमता आहे.
केवळ मधच नाही तर इतर पदार्थ बनवले जातात
अनेक राज्यांतील शेतकरी मधमाशीपालन करत असून त्यांचे उत्पन्न वाढत आहे. मधमाशी पालन आणि मध प्रक्रिया युनिट उभारून प्रक्रिया केंद्राच्या मदतीने मधमाशीपालनातून जबरदस्त नफा मिळवता येतो.
यापासून मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बी ग्लू, मधमाशी परागकण यांसारखी उत्पादने तयार करता येतात. या सर्व उत्पादनांनाही मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सरकार करत आहे मदत
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने पीक उत्पादकता सुधारण्यासाठी मधमाशी पालन विकास नावाची एक केंद्रीय योजना सुरू केली आहे.या योजनेचा हेतू मधमाशीपालन क्षेत्राचा विकास, उत्पादकता वाढवणे, प्रशिक्षण देणे आणि जनजागृती करणे हा आहे. देशात नॅशनल बी बोर्ड (NBB) ने नाबार्डच्या सहकार्याने मधमाशी पालनासाठी आर्थिक सहाय्यासाठी योजना सुरू केल्या असून सरकार 80 ते 85 टक्के अनुदान देत आहे.
असे मिळवा पैसे
तुम्ही 10 पेट्या घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता. प्रति पेटी 40 किलो मध मिळतो. समजा 10 पेट्यांचे 400 किलो मध 350 रुपये किलो दराने विकला तर तुम्हाला 1.40 लाख रुपये मिळतील.
तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही 100 पेट्या घेऊ शकता. समजा प्रति पेटी 40 किलो मध उपलब्ध असेल तर एकूण मध 4000 किलो होईल. हा 400 किलो मध 350 रुपये प्रति किलो दराने विकला तर तुम्हाला 14,00,000 रुपये मिळतील. तसेच जर एका पेटीची किंमत रु.3500 आली तर एकूण किंमत रु.3,40,000 होईल. त्यामुळे तुम्हाला 1,75,000 किरकोळ आणि इतर खर्च (मजुरी, प्रवास इ.) रु. 1,75,000 जाऊन निव्वळ नफा रु.10,15,000 होईल.