राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ईडीच्या रडारवर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- महाराष्ट्रात साखर कारखान्यांना चार सहकारी बँकांनी दिलेल्या 750 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या रडारवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले आहेत.

हा साखर कारखाना ज्या कंपनीने लीजवर घेतला होता त्या कंपनीचा संबंध अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी असल्याचे सांगितले जाते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

ईडीने ज्या चार सहकारी बँकांना नोटीस बजावली आहे त्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचाही समावेश आहे. या बँकेच्या संचालकपदीही पवार होते. जारंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या 750 कोटी रुपयांच्या कर्जाची ईडी चौकशी करीत आहे.

जारंडेश्वर कारखाना गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रा. लि. ने खरेदी केला होता. त्यानंर जारंडेश्वर एसएसकेचे जारंडेश्वर साखर कारखाना प्रा. लि. या नावे लीज देण्यात आली.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, हा कारखाना खरेदी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या निधीचा एक भाग स्पार्कलिंग रॉयल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे प्राप्त झाला होता.

ही कंपनी अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित आहेत. जारंडेश्वर कारखान्यावर स्पार्कलिंग या कंपनीचेच नियंत्रण होते, असा दावा ईडीने केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24