अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सण उत्सव अद्यापही निर्बंधाच्या चौकटीत साजरे करावे लागत आहे. यातच आता 21 जुलै राजी बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या आहेत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना
तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.
दरम्यान राज्यात काही ठिकाणी डेल्टा प्लस चे रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यात तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.