राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे.

राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. ठाण्यातल्या आम्रपाली,

नटराज आणि अँटिक पॅलेस डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन प्रसार माध्यमांनी प्रसारीत केले. त्यावर बोलताना दरकेर म्हणाले की, कोरोनामुळे अनेक गोष्टींवर बंधने घालण्यात आली आहेत. माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उद्योगांवर बंधने आली आहेत.

असे असताना दुसरीकडे डान्सबारवर बंदी असतानाही, ते राजरोसपणे सुरू आहेत. गृहमंत्री यांनी तात्काळ या प्रकरणी कारवाई केली असली तरी तात्पुरती आणि तुंटपुजी कारवाई केली गेली आहे.

गृहमंत्री यांनी पोलिस आयुक्तांना निलंबीत केले पाहिजे, अशी मागणी दरेकर यांनी गृहमंत्र्यांकडे केली. दरेकर म्हणाले की, एखादी घटना घडली की मोठ्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी छोट्या अधिकाऱ्यांचा बळी दिला जातो.

बार चालू केल्याप्रकरणी ज्याचा ज्याचा संबध आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी कारवाई करून जे असे कृत्य करतात त्यांना कायमची चपराक बसेल तर पुढे असे कृत्य करताना विचार केला जाईल त्यासाठी कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24