अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा रविवार, 23 जानेवारी 2022 रोजी पार पडणार आहे.
दरम्यान सदर परीक्षेचा कालावधी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत असणार आहे. या परीक्षेसाठी नगर शहरातील 34 केंद्रांवर दोन सत्रांत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
संबंधित परिसरात प्रवेशबंदी… या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही.
…’या’ गोष्टींना प्रतिबंध राहील यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे अहमदनगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.