परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांचे ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले यांना निवेदन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांची कर्ज मर्यादा वाढविण्याकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्याच्या मागणीचे निवेदन परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांच्या वतीने जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक मा.आ. शिवाजी कर्डिले यांना देण्यात आले.

यावेळी सोसायटीचे संचालक अप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद भाऊसाहेब जिवडे, बबन शिंदे, भाऊसाहेब रोहकले, ज्ञानदेव बेरड, ज्ञानेश्‍वर शिंदे, भाऊसाहेब शिंदे, अभय जावळे आदी उपस्थित होते. सध्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अडीचशे कोटीचे कॅश क्रेडीट मंजूर आहे.

कॅश क्रेडीटचे व्याजदर 11.50 टक्के असल्याने त्याची तेवढी उचल होत नाही. सभासदांची जामीनकीची कर्ज मर्यादा कमी असून, ती फक्त चौदा लाखाची आहे. कॅश क्रेडीटची उचल होण्यासाठी जिल्हा बँकेने व्याजदर कमी केल्यास सोसायटीला कर्ज मर्यादा वाढवता येणार आहे. यामुळे कॅश क्रेडिटची उचल होणार आहे.

इतर बँकाप्रमाणे सभासदांना मोठे कर्ज देता येऊ शकणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभासदांना सध्या 8.50 टक्क्यांनी कर्ज दिले जाते. जिल्हा बँकेने व्याजदर कमी केल्यास सोसायटीच्या सभासदांना आनखी कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करता येईल व कर्ज मर्यादा वाढवता येणार असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

या मागणीची दखल घेत जिल्हा बँकेने कॅश क्रेडिटचे व्याजदर 11.50 टक्के असताना ते व्याजदर 8.50 एवढा करण्याची मागणी परिवर्तन मंडळाच्या वतीने सोसायटीचे संचालक व सभासदांनी केली आहे. मा.आ. कर्डिले यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकित सदर विषय घेऊन सर्व संचालक मंडळाच्या परवानगीने कॅश क्रेडिटचे व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24