अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील रहिवासी शेतकरी द्वारकाबाई अशोक भुतकर यांनी स्वतःच्या मालकीची 4.5 एकर जमिनीपैकी 2 एकर जमीन बर्डे यांना सुमारे 3 वर्षांपूर्वी विकली आहे.
जमीन विकणे पूर्वी त्यांच्या एकूण 4.5 एकर जमिनीवर युको बँक शनिशिंगणापूर यांचे 4 लाख 50 हजार कर्ज होते 2017 सालि महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत त्यांना दोन लाख कर्जमाफी झालेली आहे
तसेच शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत 2020 -21 मध्ये सरसकट कर्जमाफी मध्ये युको बँक शाखा शनिशिंगणापूर व्यवस्थापनाने जाणून-बुजून त्यांना या दोन्ही योजनाचा कागद पुरती करूनही लाभ दिला नाही,
याउलट त्यांनी द्वारकाबाई अशोक भुतकर यांना बँकेची थकबाकी वसुलीसाठी नोटीस पाठवली, हा अन्याय केल्याच्या निषेधार्थ जनधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच.
युको बँकेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्जाचा पहिला हप्ता ही फेडला. त्यांनतर दुष्काळ पडल्यामुळे, आणि त्याच काळात त्यांचा 4 एकर ऊस जळल्याने,पुढील हप्ते थकले. काही काळानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली.
भुतकर यांनी कर्जमाफी साठी फॉर्म, आणि कागदपत्रे बँकेत जमा केली. परंतु युको बँकेच्या मॅनेजर ने त्यांना कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव नाही म्ह्णून पुन्हा पाठवले. असे वारंवार घडत गेले. या सर्व प्रकारात कर्जमाफीच्या फॉर्म ची मुदत संपून गेली.
महिनाभरानंतर अचानकच कर्जाचे हप्ते थकले असल्यामुळे बँकेकडून कर्जवसुलीची नोटीस भुतकर यांना पाठवण्यात आली. तरी या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी भुतकर यांनी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
युको बँकेच्या व्यवस्थापनाने किंवा मॅनेजर ने जाणूनबुजून द्वारकाबाईंवर अन्याय केला आहे, असे जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी सांगितले. तसेच याप्रकरणात भुतकर यांना न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर,
आणि युको बँक शनिशिंगणापूर या ठिकाणी जन आधार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पोटे म्हणाले.
यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, द्वारकाबाई भुतकर, महिला अध्यक्ष शालिनी लांडे, राजू लांडे आदी उपस्थित होते.