नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. अद्यापही संकटाचे ढग बळीराजावर कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या काही भागात मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तसेच कोपरगाव तालुक्याच्या अन्य भागात अजून मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही तेव्हा शेतकर्‍यांनी पीक पेरणीची घाई करू नये, असे आवाहनही कोल्हे यांनी केले आहे. यामध्ये कोल्हे यांनी म्हटले आहे, चालू हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे.

मात्र तो ढग फुटी सदृश पडून शेतीचे बांध, जनावरांसाठी चारा पिके, ऊस पिके, चाळीत साठवलेला कांदा, फळबागा, शेड, तात्पुरते झाप यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आधीच करोना महामारीमुळे अनेकजण अडचणीत आलेले आहेत. त्यात ढगफुटीचे संकट शेतकर्‍यांवर ओढवलेले आहे.

त्यामुळे त्यांचे नुकसानीचे पंचनामे शासनाने तात्काळ करावेत, त्याचप्रमाणे मागिल हंगामाचा पीक विमाबाबत तातडीने पाऊले उचललवीत, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24