file photo

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र आता पुन्हा एक चिंतेची बाब समोर आली.

असून कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा सब-लिनियज AY.4 हा व्हेरिएंट आढळला आहे. मात्र, हा नवा व्हेरिएंट AY.4 चिंताजनक आहे की नाही, याचा तपास अद्याप सुरू आहे.

सुत्राच्या मते, गेल्या आठवड्यात पूर्ण झालेल्या सर्वात अलीकडील जीनोम सिक्वेंसींगमध्ये AY.4 सह अनेक ‘डेल्टा डेरिव्हेटिव्ह’ सापडले.

“पहिल्यांदा डेल्टा प्लस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेल्टा आणि त्याचे डेरिव्हेटिजला अद्याप वेगळे मानले जात नाही. ” रिपोर्टनुसार , मुंबई बीएमसीची एक टीम रुग्णांच्या मेडिकल रिपोर्टसह डेल्टा व्हेरिएंटचा रिपोर्ट एकत्र करत आहे,

जेणेकरून हे ​​जाणून घेण्यासाठी की या व्हेरिएंटने कोविडची लक्षणे आणि गंभीरता बदलली आहे का? जर तसे असेल तर कसे? रिपोर्टमध्ये एका डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे की,

“कोणताही व्हेरिएंट तेव्हाच चिंताजनक असतो, जेव्हा आम्हाला स्पष्टपणे माहित असेल की त्याचे प्रसारण वाढले आहे किंवा ते संसर्गाचे कारण बानू शकते.

” बेंगळुरूमध्ये संक्रमित लोकांचे नमुने जीनोम सिक्वेंसींगसाठी शुक्रवारी पाठवले गेले. या काळात तीन लिनियज सापडले, ज्यात डेल्टा आणि त्याचे सब-लिनियज AY.4 आणि AY.12 समाविष्ट आहेत.