कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी यावर प्रभावी ठरत असलेली लस शोधून काढली. यानंतर जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे.

करोना संसर्गावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. तर, काही देशांमध्ये नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन, प्रोत्साहित केले जात आहे.

करोना लस घेतल्यानंतर काही पथ्यं पाळण्याची सूचना केली जात आहे. कोरोना लस घेतल्यानंतर काही पथ्ये पाळण्याची सूचना केली जात आहे. काही ठिकाणी मद्यपान, धूम्रपान करू नये, असे सांगितले जाते.

मात्र आता रशियातील आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस शरीर संबंधापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.शरीर संबंध ठेवल्याने मानवी शरिराची अधिक प्रमाणात ऊर्जा जाते.

त्यामुळेच लस घेतल्यानंतर शरीर संबंधापासून दूर राहण्याचा सल्ला देत असल्याचे डॉ. डेनिस ग्रेफर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.फक्त शरीर संबंधच नव्हे तर अधिक श्रम करावे लागणारी कामेही टाळावीत, असे डॉ. ग्रेफर यांनी सांगितले आहे.

मात्र, काही वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रेफर रूस यांचा दावा फेटाळला आहे. दरम्यान रशियाने करोनाच्या संसर्गावर पहिल्यांदा लस विकसित केला असल्याचा दावा केला. स्पुटनिक व्ही या लशीला मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात रशियाने मंजुरी दिली होती.

त्यानंतर काही देशांमध्ये या लशीचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. भारतानेही आपत्कालीन वापरासाठी रशियाच्या स्फुटनिक व्ही लसीला मंजुरी दिली आहे. डॉ. रेड्डीज लॅब या लसीचे उत्पादन भारतात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24