अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव हा जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये आढळून आला.

यामध्ये संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहाता या तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून आली.

मात्र आता काहीसा दिलासाजनक परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. राहाता तालुक्यात बुधवारी109 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्या 264 वर जाऊन पोहोचली आहे. तर 542 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

राहाता तालुक्यात आतापर्यंत 19330 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 18788 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

तालुक्यात सध्या तालुक्यात केवळ 542 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24